दि. १४.०८.२०२३
Vidarbha News India
जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर यांनी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीचे वतीने जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर यांनी गडचिरोली जिल्हा परिषद च्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर यांनी आपल्या सहकारी शिक्षक बंधु सोबत १० आॉगष्ट २०२३ रोज गुरुवार ला सायं ६.०० वाजता गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हातील प्रलंबित असलेल्या प्रमुख समस्यां संदर्भात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गडचिरोली जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हाकोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, जिल्हा सल्लागार निलकंठ निकुरे, दिलीप देवतळे, सत्यवान मेश्राम, राजेश सहारे, रविंद्र आडे आदी मान्यवर उपस्थित होते.
