दि. ०८.०८.२०२३
Vidarbha News India
घोरपडीची शिकार करणार्याला अटक, दोघे फरार...
विदर्भ न्यूज इंडिया
गोंदिया/अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील वडेगाव जंगलात कुत्र्यांच्या मदतीने Ghorpadi arrest घोरपडींची शिकार करणार्या आरोपीला अर्जुनी मोरगाव वनविभागानेˆअटक केली. कार्तिक मडावी रा.बुधेवाडा असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दीड किलो घोरपडीचे मांस जप्त करण्यात आली. याप्रकरणात दोन आरोपी फरार आहे.
अर्जुनी मोरगाव वन विभागातील वडेगाव क्षेत्राचे क्षेत्र सहायक हे वडेगाव सरकारी जंगलात कक्ष क्रमांक 1168 सरंक्षीत वन बिट येथे गस्त करीत असताना तीन जण संशयीतरित्या आढळून आले. त्यांची Ghorpadi arrest चौकशी केली असता त्यांच्याकडे घोरपडीचे कच्चे मांस आढळून आले. दरम्यान त्यातील दोघांनी जंगलात पळ काढला तर कार्तिक मडावीला वन कर्मचार्यांनी ताब्यात घेतले. त्याने कुत्र्याच्या सहायाने दोन घोरपडीची शिकार केल्याची कबुली दिली. वन विभागाने त्याच्याकडून घोरपडीचे दिड किलो मांस ताब्यात घेतले असून वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48, 49(इ), 50, 51 अन्वये वनगुन्हा दाखल केला. आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 10 ऑगष्टपर्यंत वनकोठडी सुनावलेली आहे. उर्वरीत दोन आरोपींचा अर्जुनी/मोरगाव वन विभाग शोध घेत आहे.