दि. ०९.०८.२०२३
गोंडवाना विद्यापीठात मेरी माटी,मेरा देश अभियानाअंतर्गत घेण्यात आली शपथ तसेच वृक्षारोपण...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत 'मेरी माटी, मेरा देश' अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियान गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिक्षक व कर्मचारी यांना गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी शपथ दिली.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ होत असतानाच हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या मेरी माटी, मेरा देश या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळाली आहे.
स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला उद्युक्त करणारा हा उपक्रम आहे.
असे विचार प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे यांनी केले.
यानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी वृक्षारोपण केले.हा कार्यक्रम रासेयो संचालक डॉ. शयाम खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.