दि. ०९.०८.२०२३
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गांधी चौक गडचिरोली येथे ढोल ताशाच्या गजरात डीजेसह भव्य रॅलीचे आयोजन..
आज जागतीक आदिवासी दिनानिमित्ताने खासदार अशोक नेते यांनी समस्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गांधी चौक गडचिरोली येथे ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅलीचे आयोजन.
आदिवासी बांधवांची गर्दी बघून गडचिरोली झाली पिवळ्या रंगाची..
आज गडचिरोली शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गांधी चौक गडचिरोली येथे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव एकत्र येऊन ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे.
आजच्या या कार्यक्रमामुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आणि अवघी गडचिरोली पिवळ्या रंगाची झाल्याची बघायला मिळाली...
यानिमित्ताने गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे माननीय. श्री. अशोकजी नेते यांनी आदिवासी समाज बांधवांसोबत सदैव सतत व आपुलकीचे प्रेम राहील. येथील आदिवासी ची संस्कृती जपत आनंदाने,उत्साहाने आज रॅलीचे आयोजन केले.मी दिल्ली येथे अधिवेशनात असल्याने हजर राहता आले नाही अशी खेद वक्तव्य करत आज जागतिक आदिवासी दिनाच्या समस्त आदिवासी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या...