दि. ०६.०८.२०२३
कोया किंग अँड क्वीन कार्यक्रमाचे आयोजन खरोखरच कौतुकास्पद ; आ. डॉ. देवरावजी होळी
- गडचिरोली येथे नॅशनल लेव्हल ट्रायबल कल्चरल मॉडेलिंग कॉम्पिटिशन, "कोया किंग अँड क्वीन "या कार्यक्रमाचे आयोजन...
- आपल्या चित्रपटासाठी गडचिरोली जिल्ह्याची निवड करून स्थानिक कलाकारांना प्राधान्य देणाऱ्या सीने अभिनेत्री , निर्माती तृप्ती भोईर यांचेही केले अभिनंदन.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली सारख्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यामध्ये नॅशनल लेव्हलची ट्रायबल कल्चरल मॉडेलिंग कॉम्पिटिशन "कोया किंग अँड क्वीन" या स्पर्धेचे आयोजन खरोखरच अभिनंदनीय व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी "कोया किंग अँड क्वीन" या कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.
नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन (नारीशक्ती) जिल्हा शाखा गडचिरोली व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन सुमानंद सभागृह गडचिरोली येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर देवरावजी होळी प्रामुख्याने उपस्थित होते.
अतिशय सुंदर प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी यावेळी आयोजकांचे कौतुक केले.
प्रसिद्ध सिने अभिनेत्री, दिग्दर्शिका ,लेखिका निर्माती, मा.तृप्ती भोईर यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्याची निवड करून या चित्रपटांमध्ये स्थानिक जिल्ह्यातील आदिवासी, गैर आदिवासी कलाकारांना प्राधान्य देऊन काम करीत असल्याबद्दल त्यांचेही यावेळी त्यांनी अभिनंदन केले.