दि. ०६.०८.२०२३
आ. डॉ. देवरावजी होळी यांनी सुरू केला विकास कामांचा धडाका; विविध विकास कामांचे केले भूमिपूजन
- सुभाषग्राम, आनंदग्राम, गुंडापल्ली येथे विविध विकास कामांचे केले भूमिपूजन
- परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदारांचे गावकऱ्यांना आश्वासन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांचा धडाका सुरू केला असून चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम , गुंडापल्ली, आनंदग्राम, वसंतपूर या गावांमध्ये २५-२५ लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी केले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष बंगाली आघाडी सुरेश शहा सुभाषग्राम येथील उदयजी मंडल उपसरपंच, अनुप सिकंदर, सदस्य रेवा, सरदार ग्रामपंचायत सदस्य, निरंजन बाछाड ,भोपाल ठेकेदार अशोक वैरागी, तालुका आघाडीचे महामंत्री विकास मित्र ,रवींद्र पाल, प्रामुख्याने उपस्थित होते तर गुंडापल्ली येथे विद्याधर सामडे,प्रकाश सिडाम ,रवींद्र पवार , राजेश्वर दुर्गे, उषाताई सिडाम, सदस्य प्रफुल दुर्गे, विजय चांदेकर अशोक वैद्य तर गुंडापल्ली याप्रसंगी बंगाली आघाडी यांचे सहप्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सुभाषग्राम येथील सुभाष बाछाड ते विष्णुपद शहा सी सी रोड बांधकाम करणे, महंत वैद्य ते सुभाष बाछाड सी सी रोड बांधकाम करणे, गुंडापल्ली येथे परशुराम सिडाम ते गंगाधर पेंदोर सी सी रोड बांधकाम करणे, सुभाष ग्राम येथे दुलाल मंडल ते बाबुराव श्यामल राय ते नेपाल मिध्रा या २५-२५ लक्ष रुपयाच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन त्यांनी यावेळी केले.