दि. ०६.०८.२०२३
Vidarbha News India
Buldhana News : रेशनाचा साठवलेला २५ क्विंटल तांदूळ जप्त; पुरवठा विभाग आणि पोलिसांची कारवाई.!
विदर्भ न्यूज इंडिया
बुलढाणा : रेशन लाभार्थीकडून खरेदी करण्यात आलेला आणि काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला २५ क्विंटल (Ration) तांदूळ साठा जप्त करण्यात आला आहे. पुरवठा विभागाने (Buldhana) सादर कारवाई केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव - भालेगाव बाजार मार्गावरील एका गोदामात साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून छापा मारला असता गोदामात साठवणूक करण्यात आलेला ५७ कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला आहे. खामगाव तालुका पुरवठा विभाग आणि पिंपळगावराजा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. तांदळाचा साठा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
पोलिसांनी (Police) जप्त केलेला तांदळाचा हा साठा सय्यद आरीफ सै. हकीम या आरोपीचा असून त्याच्या विरोधात पिंपळगाव राजा पोलिसांत पुरवठा निरीक्षक विशाल भगत यांनी तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.