दि. ०५.०८.२०२३
Vidarbha News India
- खासदार. अशोक नेते यांची पत्रपरिषदेत माहिती
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : देशातील स्मार्ट सिटीच्या तत्वावर भारताच्या अमृत महोत्सवी वर्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या भूमिपूजनाचा ऑनलाईन सोहळा उद्या, 6 ऑगस्ट रोजी रविवारला करण्यात येत आहे.
यामध्ये गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील देसाईगंज (वडसा) आणि आमगाव या रेल्वे स्टेशनचा समावेश असून देसाईगंज (वडसा) येथे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोक नेते यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेतून केले आहे.
वडसा हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमात्र रेल्वे स्टेशन आहे. Prime Minister पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात लहान रेल्वे स्थानकांचा दर्जा सुधारून स्मार्ट रेल्वे स्टेशन बनविण्याचे धोरण राबवित अमृत भारत रेल्वे स्टेशनची घोषणा केली होती. अर्थसंकल्पात निधीही उपलब्ध करून दिला असून या भूमिपूजनानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. आज, रविवारी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत उद्घाटन सोहळा चालणार आहे. 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी खासदार नेते यांनी सांगीतले की, या दोन्हा स्टेशनचा या योजनेत समावेश व्हावा म्हणून आपला सातत्याने पाठपूरावा सुरु होता. त्यामुळे महाराष्ट्रातील 44 स्टेशनमध्ये हे रेल्वे स्टेशन स्मार्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल 18 कोटी रुपये खर्च करून वडसा रेल्वे स्टेशनचा कायापालट केला जाणार आहे. याशिवाय वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 332 कोटींची निविदा निघालेली आहे. या कामाला 1096 कोटी रुपये खर्च होणार आहेत. नागभिड-नागपूरसाठी 1400 कोटींचा खर्च होणार आहे. गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा ते आदिलाबाद, गडचिरोली-धानोरा ते भानूप्रतापपूर आणि नागभिड-कांपा-चिमूर-वरोरा या मार्गाचेही सर्वेक्षण सुरु झाले आहे. त्यामुळे गडचिरोली लोकसभा क्षेत्र चहूबाजूंनी रेल्वेने जोडले जाणार आहे. ही आपल्या खासदारकीच्या कामातील मोठी उपलब्धी असल्याचेही खासदार नेते यांनी यावेळी म्हणाले. यापूर्वी काँग्रेसच्या काळात रेल्वेला 1100 कोटींच्या वर निधी मिळत नव्हता. मात्र, मोदी सरकारने रेल्वेला 11 हजार कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांचा विकासव होण्यासाठी नो हॉलीडे पॅकेज जाहीर करावा अशी विनंतीही आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांच्याकडे नुकत्याच झालेल्या भेटी दरम्यान केली असल्याचेही त्यांनी सांगीतले. या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महामंत्री गोविंद सारडा, रवींद्र ओल्लालवार, रमेश भुरसे, सुधाकर येनगंदलवार, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, अनिल कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे, अनिल पोहनकर, स्वप्नील वरघंटे आदींची उपस्थिती होती.