खासदार अशोक नेते यांनी शेतकऱ्यांच्या शेती पाण्यासंबंधी समस्याबाबत आसोलामेंढा नुतनीकरण विभागातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

खासदार अशोक नेते यांनी शेतकऱ्यांच्या शेती पाण्यासंबंधी समस्याबाबत आसोलामेंढा नुतनीकरण विभागातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर

दि. १९.०८.२०२३

Vidarbha News India 

खासदार अशोक नेते यांनी शेतकऱ्यांच्या शेती पाण्यासंबंधी समस्याबाबत आसोलामेंढा नुतनीकरण विभागातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

विदर्भ न्यूज इंडिया 

सावली : गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांनी मागील दोन दिवस तालुक्यातील सावली येथे मंजुर झालेल्या जनसुविधेअंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन करिता दौऱ्यावर आले असता व्याहाड बुज, सामदा बुज. सोनापुर, कोंडेखल, घोडेवाही येथील तसेच तालुक्यातील शेतकरी वर्गांनी व गावांतील जनतेनी नहराच्या पाईपलाईन संबंधित समस्या दर्शविली यासाठी शेतकऱ्यांन विषयी संवेदनशील होत व शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याची ज्वलंत समस्या मार्गी लावण्यासाठी मा.खासदार अशोकजी नेते यांनी १९ ऑगस्ट २०२३ ला गोसेखुर्द विश्रामगृह सावली येथे अधिकाऱ्यांची संक्षिप्त बैठक घेतली. या संक्षिप्त बैठकीला खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, उपविभागीय दंडाधिकारी मुल चे मेश्राम, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री सतिश बोम्मावार, सावलीचे तहसिदार परिक्षित पाटील, संवर्ग विकास अधिकारी वासनिक, ता.कृषी अधिकारी अश्विनी घोडसे, वनपरिक्षेत्राधिकारी महागमकर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे हितेश लाडे व उपविभागीय अभियंता, महावितरण महाडोळे, भरडकर, सिंचाई प्रकल्पाचे पिसाड, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, भाजपा जेष्ठ नेते देवराव मुद्दमवार, प्रकाश पा.गड़्डमवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्षा विनोद धोटे, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, कविंद्र रोहणकर, मोतीराम चिमुरकर, सरपंच नितीन कारडे, सोशल मिडिया चे राकेश कोंनबतुलवार, उपसरपंच नरेश बाबणवाड़े, निखिल सुरमवार, उपस्थित होते.


Share News

copylock

Post Top Ad

-->