दि. ०१.०८.२०२३
Vidarbha News India
Rain Update : राज्यात पुढील ५ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; हवामानात झाला मोठा बदल.!
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे : राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर कमी झालेले दाबाचे क्षेत्र पुढे सरकत असून ते आज संध्याकाळपर्यंत बांगलादेश किनापट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हा कमी दाब पट्टा मंगळवारी संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्यची शक्यता आहे. त्यानंर पुढील २४ तासांत गंगेचे खोरे पार करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून पुढील चार पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या मान्सून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्ये हिमालयाच्या बाजूने आणि लगतच्या उपविभागांच्या बहुतांश भागांमध्ये, पूर्व मध्य भारत, पूर्व आणि दक्षिण पूर्व भारतातील काही भागांमध्ये नॉर्मल ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पातील बहुतेक भागांमध्ये आणि वायव्य आणि मध्य भारताच्या पश्चिम भागांच्या अनेक भागांमध्ये नॉर्मल पेक्षाही कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.