अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा(देसाईगंज) सह अन्य रेल्वे स्टेशनचे भूमीपूजन प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री आभासी पद्धतीने करणार... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा(देसाईगंज) सह अन्य रेल्वे स्टेशनचे भूमीपूजन प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री आभासी पद्धतीने करणार...

दि. ०१.०८.२०२३
Vidarbha News India
अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा(देसाईगंज) सह अन्य रेल्वे स्टेशनचे भूमीपूजन प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री आभासी पद्धतीने करणार... 
-अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा (देसाईगंज),   आमगांव,व चांदाफोर्ट या रेल्वे स्टेशन चा समावेश या   भूमीपूजनाला मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व केंद्रिय   रेल्वे मंत्री मान.अश्विनी वैष्णव हे आभासी पद्धतीने     करणार उदघाटन...
- सतत नेहमी सातत्याने रेल्वे संबंधित पाठपुराव्यामुळे     खासदार अशोकजी ‌नेते यांच्या प्रयत्नाला यश...
----------------------------------------
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्हातील एकमेव रेल्वे स्टेशन वडसा(देसाईगंज) आहे.या स्टेशनवरून नागरिकांची रहदारी मोठया प्रमाणात चालते. यासाठी रेल्वे संबंधित नेहमी सतत सातत्याने  गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी ‌नेते  यांनी  अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावलेले  आहेत. त्या बरोबर च नव्या बजेट नुसार आलेल्या अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये वडसा (देसाईगंज),आमगांव व चांदाफोर्ट या महत्वाच्या रेल्वे स्टेशन चा विकास होणार आहे, त्या बरोबरच नागरिकांना आधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत.
या अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये भारतीय रेल्वेवरील रेल्वेच्या विकासासाठी अलीकडेच अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या,या योजनेत भारतीय रेल्वेच्या ऑटोमोबाईल्स/आधुनिकीकरणासाठी अमृत ​​भारत स्थानक योजनेद्वारे रेल्वेचा विकास सातत्याने केला जातो. यामध्ये मास्टर प्लॅन तयार करणे आणि स्टेशन पोहोचणे, आयताकृती क्षेत्र, वेटिंग हॉल, टॉयलेट, लिफ्ट/एस्कलेटर, स्वातंत्र्य, मोफत वाय-फाय, स्थानिक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी किऑस्क यासारख्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने त्यांचे बांधकाम समाविष्ट आहे. प्रत्येक स्थानकावर 'एक स्टेशन एक उत्पादन', उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, कार्यकारी समुपदेशक, व्यावसायिक बैठकीसाठी नियुक्त ठिकाणे, लँडस्केपिंग इत्यादी योजनांवर भर देण्याची गरज आहे.
अमृत भारत कार्यक्रमासाठी आदरणीय पंतप्रधानांनी गेल्या ९ वर्षात सातत्याने प्रशंसनीय आणि ऐतिहासिक विकास कामे केली आहेत. या संदर्भात,०६ ऑगस्ट २०२३ रोजी माननीय पंतप्रधान देशातील ५०६ रेल्वे स्थानकांसाठी "अमृत भारत" कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
वडसा स्टेशनचा पुनर्विकास खर्च: १८.४ कोटी आहे.
वडसा (देसाईगंज), आमगांव,व चांदाफोर्ट या रेल्वे स्टेशनचा  भूमीपूजन मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दि.०६ ऑगस्ट २०२३ ला.सकाळी ०९ .०० वा.च्या दरम्यान आभासी पद्धतीने होणार आहे. यासाठी भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोकजी ‌नेते यांनी केले आहे.



Share News

copylock

Post Top Ad

-->