Vidarbha News Indiaदेशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राला माझे वंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Lokmanya Tilak National Award
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, देशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीला मी वंदन करतो. आजचा हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आज जितका मी उत्साहित आहे तितकाच भावूकही आहे. आज आपल्या सर्वांचे आदर्श बाळगंगाधार टिळक यांची पुण्यतिथी आहे. आज महत्त्वाच्या दिवशी पुण्याच्या पुण्यभूमीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी सांगितले, सरदार पटेल अहमदाबाद महापालिकेचे प्रेसिडेंट बनले तेव्हा त्यांनी अहमदाबादमध्ये टिळक यांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी व्हिक्टोरीया गार्डन ही जागा निवडली. इंग्रजांनी 1897 मध्ये राणी व्हिक्टोरीयाचा हिरकमहोत्सव साजरा करण्यासाठी हे व्हिक्टोरीया गार्डन बनवलं होतं. ब्रिटश महाराणीच्या नावाने बनवलेल्या पार्कमध्ये त्यांच्या छातीवर सरदार पटेल यांनी क्रांतीकारी लोकमान्य टिळक यांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला पण सरदार पटेलांनी सांगितले मी आपलं पद सोडेन पण मूर्ती तेथेच बसवली जाईल. Lokmanya Tilak National Award 1929 मध्ये त्या मूर्तीचं लोकार्पण महात्मा गांधींनी केलं, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो तेव्हा जबाबदारी वाढते. आज त्या पुरस्कारासोबत नाव जोडले गेल्याने दायित्वाची सीमा आणखी वाढते. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांसाठी समर्पित करतो. ज्यांचे नाव गंगाधर आहे त्यांच्या नावे मिळालेल्या या पुरस्कारासोबत मिळणारी रक्कम गंगा नदीला समर्पित करत आहेत. पुरस्काराची रक्कम नमामी गंगे योजनेसाठी दान देण्याचे ठरवलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यात लोकमान्यांच्या भूमिकेला काही शब्दातं सांगता येणार नाही," असेही पंतप्रधान म्हणाले.