पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच असताना तात्पुरत्या नियुक्त्या जाहीर, तुमच्या जिल्ह्यात कोणते मंत्री करणार ध्वजारोहण? - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच असताना तात्पुरत्या नियुक्त्या जाहीर, तुमच्या जिल्ह्यात कोणते मंत्री करणार ध्वजारोहण?

दि. ११.०८.२०२३

Vidarbha News India

Independence Day : पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच असताना तात्पुरत्या नियुक्त्या जाहीर, तुमच्या जिल्ह्यात कोणते मंत्री करणार ध्वजारोहण?

विदर्भ न्यूज इंडिया

मुंबई : पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच असल्याने अद्याप काही जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर झालेल्या नाहीत. अशातच स्वातंत्र्यदिन काही दिवसांपूर्वी ठेपला असताना राज्य सरकारने झेंडावंदन करण्यासाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

ही पालकमंत्री पदाची यादी तात्पुरती आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार अदिती तटके या रायगडमध्ये झेंडावनंद करणार आहेत. तर अमरावती येथे छगन भुजबळ झेंडावनंद करणार आहेत. परभणी येथे अतुल सावे, चंद्रकात पाटील पुणे येथे, दिलीप वळसे पाटील वाशिम येथे पालकमंत्री म्हणून झेंडावंदन करणार आहेत.

अशी आहे पालकमंत्र्यांची यादी - देवेंद्र फडणवीस (नागपूर), अजित पवार(कोल्हापूर), छगन भुजबळ( अमरावती), सुधीर मुनंगटीवार (चंद्रपूर), चंद्रकांत पाटील(पुणे), दिलीपराव वळसे पाटील(वाशिम), राधाकृष्ण विखे-पाटील (अहमदनगर), गिरीष महाजन (नाशिक), दादादी भुसे(धुळे), गुलाबराव पाटील(जळगाव), रविंद्र चव्हाण(ठाणे), हसन मुश्रीफ(सोलापूर), दिपक केसरकर(सिंधुदुर्ग), उदय सामंत(रत्नागिरी), अतुल सावे (परभणी), संदीपान भुमरे (औरंगाबाद) सुरेश खाडे( सांगली), विजयकुमार गावित( नंदुरबार), तानाजी सावंत (उस्मानाबाद), शंभूराज देसाई (सातारा), अब्दुल सत्तार (जालना), संजय राठोड( यवतमाळ), धनंजय मुंडे( बीड), धर्मराव आत्राम (गडचिरोली) अशी पालकमंत्र्यांची अंतरिम यादी आहे. हे मंत्री संबंधित जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन करणार आहेत.

पालकमंत्री नियुक्तीवरून धुसफूस- शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर नऊ मंत्र्यांनीही शपथही घेतली. ज्या जिल्ह्यात शिंदे - भाजपचे मंत्री आहेत, त्याच ठिकाणी पवार गटाला मंत्रिपद देण्यात आली आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार पालकमंत्री पद मिळवण्यासाठी तसेच जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी तिन्ही पक्षात आता रस्सीखेच सुरू झाली आहे. नाशिक, पुणे, जळगाव, कोल्हापूर आदी जिल्ह्यात अतंर्गत धुसफूस जोर धरू लागली आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी शिंदे गटाला जुळवून घ्यावे लागणार- पावसाळी अधिवेशनापूर्वी अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पवारांसह आठ जणांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीच्या अजित पवारांवर आरोपांची करीत, शिंदे गट सत्तेतून बाहेर पडला होता. आता पवारच सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली. जिल्हा पातळीवर देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी शिंदे गटाला आता जुळवून घ्यावे लागत आहे.

पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच- पालकमंत्री पद मिळवण्यासाठी पवार गटाकडून रणनिती आखली जात आहे. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री समजला जातो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यावरील पकड मजबूत करता येते. ज्याच्या हाती जिल्ह्याच्या चाव्या त्याच्याकडे मताधिक्य वाढवणे सोपे जाते. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून पालकमंत्री नेमताना ज्येष्ठतेचा निकष लावावा, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. त्यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढली असून शिंदे गटातील आमदारांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे. त्यातच आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू होणार असल्याने अधिकच धास्ती वाढली आहे.

कोणाकडे कोणते आहे पालकमंत्री पद? शिंदे गटाकडे मुंबई शहर, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, यवतमाळ, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, सातारा, रायगड या जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. तर भारतीय जनता पक्षाकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली, अहमदनगर, सोलापूर, पुणे, नंदूरबार, धुळे, नांदेड, सांगली, पालघर, सिंधुदुर्ग, जालना, बीड आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी पालकमंत्री पदाचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अन्य मंत्री दुखावले जाण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठता वाद रंगणार - कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री झाले असले तरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिंदे गटाच्या दिपक केसरकर यांच्याकडे आहे. त्यामुळे स्थानिक मंत्र्याचा विचार व्हावा, अशी मागणी होत आहे. नाशिकमध्ये दादा भुसेंकडे पालकमंत्री पद आहे. ज्येष्ठतेनुसार आता छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पदासाठी दावा केला आहे. पुण्यात भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद आहे. परंतु, अजित पवारांसह दिलीप वळसे- पाटील या हे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते या पदासाठी इच्छुक आहेत. जळगाव येथे गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवावी अशी मागणी होत आहे. दुसरीकडे आदिती तटकरे यांच्या कॅबिनेट मंत्री पदामुळे वाद रंगला असताना, रायगडचे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना दिल्यास स्थानिक आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांचा थेट विरोध असणार आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->