दि. १६.०९.२०२३
Vidarbha News India
Gadchiroli Floods : गडचिरोलीत मुसळधार पाऊस, वैनगंगाला पूर; नागपूर, चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीस बंद.!
Gadchiroli News :
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. बहुतांश ठिकाणी धरणातून शेतीला पाणी साेडा अशी मागणी हाेत आहे.
दूसरीकडे विदर्भातील गडचिरोलीत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Maharashtra News)
गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे (rain) धरणाचे (Gose Khurd Dam) सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. या ठिकाणाहून 60 हजार हुन अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीला पूर (wainganga river flooded) आला आहे.
परिणामी गडचिरोली-नागपूर (gadchiroli nagpur highway) आणि गडचिरोली-चामोर्शी (gadchiroli charmoshi highway) हे दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आज (शनिवार) सकाळी बंद झाले आहेत. आताही गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गडचिरोली जिल्ह्यात मोठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती झाली आहे. सध्या धानपिक जोमात असताना धरणाच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.