दि. १७.०८.२०२३
Vidarbha News India
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : नक्षल चळवळीत गेल्या ३० वर्षापासून कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य नक्षल नेता संजय राव उर्फ दीपक याला पकडून देण्यासाठी दोन कोटींचे बक्षीस जाहीर केले होते.
अशा नक्षलवादीला पत्नीसह तेलंगणा (Police) पोलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)
दीपक हा महाराष्ट्रातल्या ठाण्याजवळील अंबरनाथ येथील मूळ रहिवासी असून कश्मीरमध्ये बीटेकच शिक्षण घेतल्यानंतर तो महाराष्ट्रात परतला. त्यानंतर नक्षल चळवळीत तो सामील झाला. महाराष्ट्रासह काही राज्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दरम्यान पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथे २०१५ मध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन जणांना अटक झाली होती. त्यावेळी संजय तिथून निसटला होता. नक्षल चळवळीशी संबंधित काही साहित्य, शस्त्र आणि रोख रक्कम त्या ठिकाणी सापडली होती.
सध्या संजयकडे कोकणसह पश्चिम घाटात नक्षल चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आणि पश्चिम घाट विशेष क्षेञ समितीचा तो सदस्य होता. नक्षलवाद्यांच्या सर्वात मोठ्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या संजयवर महाराष्ट्र सरकारने ५० लाखाचे तर इतर राज्याचे मिळुन दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र तेलंगणा पोलिसांनी संजयसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली आहे. संजयची पत्नीही नक्षल असुन तिलाही बंगलुर येथून पोलीसानी अटक केली आहे.