गडचिरोली : चरित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीची हत्या.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : चरित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीची हत्या.!

दि. १७.०९.२०२३

Vidarbha News India

गडचिरोली : चरित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीची हत्या.!

Gadchiroli News : Suspecting character 

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली/कुरखेडा : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवारी, 15 सप्टेंबर रोजी पहाटेचा सुमारास कुरखेडा येथे आंबेडकर वार्डात घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.राहत ताहेमीम शेख (30) असे मृतक पत्नीचे नावच असून ती शिवसेना (उबाठा) गटाची यूवती सेना शहर प्रमुख होती.

ती पती ताहेमीम वजीर शेख (38) यांच्यासह आंबेडकर वार्डात मागील काही वर्षापासून राहत होती. या दांपत्याना 8 व 5 वर्षाचे दोन अपत्य सुद्धा आहेत. पती हा नेहमीच पत्नीचा चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडण करीत होता. शुक्रवारी हा भांडण विकोपाला गेल्याने रागाच्या भरात पत्नीने पत्नीचा गळा चिरत व पोटावर छूर्‍याने वार करीत हत्या केली.

आरोपी ताहेमीम शेख हा रजेगांव जि. गोंदिया येथील रहिवासी असून मागील काही वर्षापासून तो सासूरवाडी असलेल्या कुरखेडा येथे कुटूंबासह राहत होता. दूमजली असलेल्या घरात खाली सासू सासरे तर वरच्या मजल्यावर पती-पत्नी, अपत्य व आरोपीचे वडील राहत होते. या घटनेच्यावेळी मूले व वडील घरीच होते.suspecting character वडील दूसर्‍या खोलीत असल्याने त्यांना घटनेची माहीती कळू शकली नाही. तर खाली राहणारे सासर्‍याची तब्येत अस्वस्थ असल्याने ते येथील उपजिल्हा रूग्णालयात होते. त्यााच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा होती. ते पहाटे 4 वाजता रूग्णालयातून चहा घेण्याकरीता घरी आले. मुलीला चहा करून मागण्याकरीता तिच्या खोलीत गेले असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडून असल्याचे दिसून आले. दरम्यान, आरोपीने पहाटेच कुरखेडा पोलिस स्टेशन येथे पोहचत गुन्ह्याची कबूली देत आत्मसमर्पण केले.मृतकाचे वडील नजत सय्यद यांच्या तक्रारीवरून पोलिसानी आरोपी विरोधात भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक वर्षा बोरसे, पोलिस उपनिरीक्षक एस. आर. अवचार करीत आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->