दि.१७.०९.२०२३
पोभुर्णा : जुनगांव वैनगंगा उपनदी पुरामुळे रहदारीचा मार्ग ठप्प.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/चंद्रपूरपोभुर्णा : तालुक्यातील जुनगांव वैनगंगा उपनदीला पुरपरिसथितीचया पाण्याने वेढलया गेल्याने सभोवताली पाणी साचल्या जाऊन जुनगाव येथील वाहतुकीचे मार्ग ठप्प झाले आहे. गोसीखुर्द धरणाचे तेतीस दरवाजे उघडुन नदीला सोडले गेल्याने जुनगाव देवाडा बुज गंगापूर टोक पिपरी देशपांडे इत्यादी गावातील नदी नाले नजिकच्या शेतकरयाचया कापुस सोयाबीन धान पिकांना जोरदार फटका बसल्या गेला आहे. त्यामुळे कित्येक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या साली शेतकरयानी हात उसने शेतपिक कर्जाची उचल करुन पिकाची लागवड केली परंतु धरनाचे पाणी नदीला सोडले गेल्याने वैनगंगा उपनदी जोरदार फुगल्या जाऊन रुद्रावतार धारण केल्याने पुरपरिसथितीचा सामना करण्याची पाळी आली आहे. तेव्हा तालुका जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून शेतकरयांना नुकसान भरपाई देण्यात यावा अशा मागणीला जोर धरल्या जात आहे.