दि.१९.०९.२०२३
Vidarbha News India
अहेरी येथील राजवाड्यात गणरायाची प्रतिष्ठापना
- सर्व सामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी लाभू दे, ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी गणारायाला घातले साकडे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/अहेरी : गणेशोत्वासानिमित्त आज अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. यावेळी सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू दे, अश्याप्रकरे श्री गणरायाला ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी साकडे घातले.
ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या निवासस्थानी म्हणजे राजवाड्यात दरवर्षी गणेशोत्सव, दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज राजवाड्यात गणरायाचे आगमन होताच यावेळी घरचे सर्व सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठपणा करून ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी विधिवत पूजा, आरती केली. यावेळी ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी घरचे सर्व सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.