दि.०४.०९.२०२३
आ. डॉ. देवरावजी होळी यांनी विधानसभेतील प्रत्येक गावाच्या विकासाचा घेतला संकल्प...
- रेगडी, विकासपल्ली व मक्केपल्ली, येथे आ. डॉ. देवरावजी होळी यांचे हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन...
- विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी आणणार; आमदार होळी यांचे प्रतिपादन...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : आपल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या विकासाचा आपण संकल्प केला असून प्रत्येक गावाच्या विकासासाठी भरीव निधी आणून गावाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी रेगडी मक्केपल्ली व विकासपल्ली येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
याप्रसंगी बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा रेगडी येथील उमाजी नेवारे, व्यंकटेश गोरडवार, देवराव खडरे, राकेश विश्वास, सुरेश मांडवगडे, विकासपल्ली येथील तपन मंडल, शामल सिकदार, गुरुदास सिकदार दिवाकर मंडल, मक्केपल्ली येथील रुपेश वैरागी, आदित्य कांदो, केशव खोब्रागडे, राहुल कांदो यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.