गडचिरोलीच्या 'शुभम'ने MPSC परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोलीच्या 'शुभम'ने MPSC परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला

दि. १८.०९.२०२३

Vidarbha News India

गडचिरोलीच्या 'शुभम'ने MPSC परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली :  महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील शुभम येलेश्वर कोमरेवार या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ध्येय साध्य करायचे असेल तर प्रयत्न आणि कष्ट तर केलेच पाहिजे.

स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात. मात्र, त्यातील मोजकेच विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण होतात. विशेष म्हणजे शासकीय नोकरी करत त्याने या यशाला गवसणी घातली आहे. शुभम येलेश्वर कोमरेवार (वय २६) असे त्या मुलाचे नाव आहे.

जानेवारी २०२३ मध्ये सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय या पदासाठी शुभमने परीक्षा दिली होती. त्यात तो पात्र ठरला. त्यानंतर तो १ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखतीला समोर गेला. परीक्षेत २०० पैकी ११६ गुण आणि मुलाखतीमध्ये ५० पैकी ३५ असे एकूण १५१ गुण मिळवून तो राज्यात प्रथम आला.

शुभमचे वडील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तर आई पदवीधर शिक्षिका आहे. वडील धानोरा पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना शुभमचे प्राथमिक शिक्षण त्याच तालुक्यातील ईरूपटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर ५ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण गडचिरोली येथील गोंडवाना सैनिक विद्यालयात झाले.

उच्च माध्यमिक शिक्षण त्याने शिवाजी कनिष्ठ विज्ञान विद्यालयात पूर्ण केले. घरची परिस्थिती चांगली असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने नागपूर गाठले. मत्स्य व पशुधन विद्यापीठ, नागपूर येथून त्यांनी मत्स्य विज्ञान शाखेत डिस्टिंक्शन प्राप्त करत पदवी मिळविली. त्यानंतर मास्टर करण्यासाठी भारतातून ३३वा क्रमांक पटकावून तो सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) मुंबई येथे दाखल झाला.

शिक्षण सुरू असतानाच २०१९ ला सरळसेवा भरतीतून सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (Maharashtra Rank-10) पदावर नियुक्ती झाली. सध्या सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदावर प्रादेशिक मत्स्य व्यवसाय कार्यालय, पुणे येथे शुभम कोमरेवार कार्यरत आहे.

सप्टेंबर २०१९ त्याची या पदावर नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे त्याची पहिली नियुक्ती गडचिरोलीत त्याच्या स्वत:च्याच जिल्ह्यात झाली. त्याने गडचिरोली येथे ३ वर्षे ७ महिने सेवा दिली. दरम्यान, त्यांनी सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कारभार सांभाळलेला आहे.

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार

भविष्यात देशाला प्रथीनयुक्त अन्नसुरक्षा शाश्वत ठेवण्यासाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे महत्त्वाचे योगदान राहणार आहे. या संधीद्वारे मी राज्यतील मत्स्य व्यावसायिकांना आणि पारंपरिक मासेमारांना प्रोत्साहन देऊन मत्स्य उत्पादनात वाढ करण्यास प्रयत्नशील राहणार आहे, असे शुभम कोमरेवार यांनी सांगितले.


Share News

copylock

Post Top Ad

-->