नागपूर शहरात होणार राज्यस्तरीय महायोगोत्सव संमेलन... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

नागपूर शहरात होणार राज्यस्तरीय महायोगोत्सव संमेलन...

दि. ०६.०९.२०२३
Vidarbha News India
नागपूर शहरात होणार राज्यस्तरीय महायोगोत्सव संमेलन...
- २०२३ च्या महायोगोत्सव संमेलनात राज्यातील योगशिक्षकांचा सहभाग...
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/नागपूर :  योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचालित महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघ आयोजित बहुप्रतीक्षेत असलेले दुसरे राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन 'महायोगोत्सव २०२३' चे नागपूर येथे होणार असल्याचे आवाहन राज्य संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष डाॕ. मनोज निलपवार यांनी केले.
नाशिक येथे १० व ११ डिसेंबरला पहिले संमेलन नुकतेच पार पडले. तर नागपूर येथे होऊ घातलेले २०२३ चे दुसरे संम्मेलनात राज्यातील शेकडो योगशिक्षकांच्या उपस्थितीत महायोगोत्सव २०२३ चे संमेलन नागपूरकरांसाठी सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्हयांमधील हजार पेक्षा अधिक साधक उपस्थित राहणार आहेत. योगाचा प्रचार व प्रसारच्या हेतूने प्रथमच अशाप्रकारचे राज्यस्तरीय संमेलन नागपूर शहरात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष विनायक बारापात्रे यांनी दिली. 
२०२३ च्या संमेलनात योगाच्या शास्त्रीय ज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, जास्तीत जास्त योगशिक्षक तयार व्हावेत, समाजामध्ये आरोग्यासंबंधी जाणीव जागृती निर्माण व्हावी, योगशिक्षकांच्या अडीअडचणी शासन दरबारी पोहोचवून त्यांचे निराकरण व्हावे, या बहुविध उद्देशाने हा महायोगोत्सव मेळावा घेण्यात येत आहे. यामध्ये तज्ज्ञांची व्याख्याने, योगाशी संबंधित प्रात्यक्षिके, संशोधनपर निबंध, संगीत रजनी या संमेलनात भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. अशी माहिती योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचालित, महाराष्ट्र योगशिक्षक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष डाॕ मनोज निलपवार यांच्या प्रेरणेने, राज्य नियोजन समितिचे अध्यक्ष विनायक बारापत्रे, सदस्य शरद बजाज, प्रसाद कुलकर्णी, चंद्रकांत अवचार, राहुल येवला, कृणाल महाजन, संतोष खरटमोल, अंजली देशपांडे, चंद्रज्योती दळवी, मनिषा चौधरी, अनुराधा इंगळे, प्रांजली लागू, राज्य मिडिया प्रभारी दिलीप ठाकरे, योगासन स्पर्धा राहुल येवला व स्पर्धा समिती, महासचिव  अमित मिश्रा नागपूर नियोजन समितीचे अध्यक्ष लता होलगरे यांनी दिली. स्थानिक नियोजन समिती,नागपूर जिल्ह्य़ा अध्यक्ष पुरुषोत्तम थोटे,महासचिव राजेश यादव, कोषाध्यक्ष उषा हिंदारिया,छगन ढोबळे (योग मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य), तानाजी कडवे (नागपूर शहर अध्यक्ष), शंकरजांभुळकर (उपाध्यक्ष), संगीता मिश्रा (उपाध्यक्ष), मनोहर पाल (नियोजन कर्ता), राजेश धरमठोक (सचिव) वैशाली श्रिगीरवार (संघटन सचिव) अनिल मोहगांवकर (योगासन परिक्षक) भुषन टाके (योगासन परिक्षक) सुनील मोहड (जिल्हा मिडिया प्रभारी)

Share News

copylock

Post Top Ad

-->