दि. ०६.०९.२०२३
पोलीस पाटलाच्या प्रश्नपत्रिकामध्ये घोळ झाल्याचा आरोप; जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलाची रिक्त जागा निघाली त्याकरिता जिल्ह्यातील सर्व उमेदवार आपापल्या तालुक्यातील उपविभागीय कार्यालयात अर्ज सादर केले होते. पोलीस पाटील पदाचे पेपर दि.०२.०९.२०२३ ला शिवाजी हायस्कूल चामोर्शी येथे घेण्यात आले होते.परंतु पोलीस पाटलाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होणे अगोदर सील (फुटून) असल्याने निदर्शनास आले. पोलीस पाटलाच्या प्रश्नपत्रिका मध्ये घोळ झाल्याचा उमेदवारांना संशय आले. तेव्हा शिवाजी हायस्कूल सेंटरमधील चिमूर सिमुळलतला १५ उमेदवार संबंधित परीक्षकांना विचारले असता “असेच पाहण्याकरिता खोलले आहेत “असे उत्तर मिळाले.
यावरून आम्हाला खात्रीशीर संशय झाले. या पोलीस पाटलाच्या परीक्षामध्ये घोळ झाले असून याची विभागीय सखोल चौकशी करून दोषीवर योग्य ती कार्यवाही करून सर्व उमेदवारांना योग्य न्याय मिळवून देण्याकरिता सिमुलतला येथील सर्व उमेदवार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.