दि. १४.०९.२०२३
मालेवाडा येथे बैल पोळा उत्साहात साजरा...
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी : रजत डेकाटे
नागपूर/ भिवापूर : मालेवाडा येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बैल पोळा उत्सव समितीच्या वतीने प्रथम व द्वितीय व तृतीय येणाऱ्या बैल जोडीस बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात प्रथम आलेल्या नरेंद्र मेश्राम च्य बैल जोडीला डॉ.दिलीप गुप्ता यांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बैल पोळा उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सुरेश तिडके,राजु इंगोले, वासुदेव लोणगाडगे, विनायक जानवे, रविंद्र सुर्यवंशी, देविदास भजभुजे, युवराज खंडाळ, जितेंद्र सहारे, संजय नेवारे, विकास गोवारदिपे आदींची उपस्थिती होती.