मोठी बातमी! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरणार... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मोठी बातमी! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरणार...

दि. २९.०९.२०२३
Vidarbha News India
Tehasildar Post | मोठी बातमी! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरणार...
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई :
 राज्य शासनानं सरकारी पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यापूर्वी सरळसेवा भरती कंत्राटी पद्धतीनं भरण्याची जाहीरात सरकारनं काढली होती.
आता तहसीलदार पदासाठीही कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळं राज्य सरकारनं होतकरु तरुणांना पुन्हा एकदा झटका दिला आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जाहीरातीत उघड
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं तहसीलदार पदाची जाहिरात काढली असून ही भरती कंत्राटीपद्धतीनं होणार आहे. या जाहिरातीनुसार, नायब तहसीलदार, कारकून पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) प्रशासनात येण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
तहसीलदारपदासारखी जागा जर कंत्राटी पद्धतीन भरली जाणार असेल तर आम्ही काय करायचं? असा सवाल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->