दि. २८.०९.२०२३
नागपूर : जिल्यातील हजारो मच्छिमारांवर उपासमारीचे संकट.!
- मच्छीमारांसाठी १० कोटींचा विशेष पॅकेज द्या...
प्रतिनिधी/सतीश भालेराव
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : आधीच जिल्यातील अनेक जलाशय पूर्ण भरलेले होते त्यात रविवारच्या अतिवृष्टीने तलावातील हजारो टन विक्रीयोग्य मासे वाहून गेल्याने मत्स्यव्यवसाय संस्था अडचणीत सापडल्या आहेत करीता जिल्हा प्रशासनाने तत्काळ १० किटीचे विशेष पॅकेज तत्काळ जाहीर करावे अशी मागणी अमोल बावणे-जिल्हा कार्याध्यक्ष भाजप मच्छीमार आघाडी तथा विभागीय अध्यक्ष म.म.संघर्ष कृती समिती नागपूर यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे जलाशयातील विक्रीयोग्य मासे तथा मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्गमुळे वाहून गेल्या मुळे मत्स्यव्यवसाय संस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मत्स्य व्यवसाय संस्थांच्या सभासदांना रोजगार घेण्याचा मोठा प्रश्नच संस्थांसमोर उभा राहीला आहे. पुन्हा नव्याने मत्सबिज जलाशयामधे टाकून संस्थेच्या सभासदांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून देण्यास मदत होईल याकरिता जिल्हाधिकारी नागपूर यांच्याशी सविस्तर चर्चा करून संस्थांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी याकरिता जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमोल बावणे (जिल्हा कार्याध्यक्ष-भाजप मच्छीमार आघाडी नागपूर तथा म.म.संघर्ष कृती समिती नागपूर विभाग) मोरेश्वर शिंदे, मेश्राम, (जिल्हा अध्यक्ष म.म.संघर्ष कृती समिती नागपूर) दत्तुभाऊ पढाल (उपाध्यक्ष म.म.संघर्ष कृती समिती नागपूर) रामराव बावणे (उपाध्यक्ष-जिल्हा मच्छीमार संघ नागपूर) बालुभाऊ बावणे,दीपक बगडे,हरीश नागपुरे,शैलेश नगरे, उमाशंकर बागडे,पुरुषोत्तम बोबडे, सोमाजी मोरे,विजयभाऊ ढाले,शुभम सोनोने,रामभाऊ मारबते,गोपीचंद बागडे,भगवान बागडे तथा जिल्ह्यातील शेकडो मच्छीमार उपस्थित होते.