सिरोंचा येथे आयटीआयमध्ये आढळला मांजऱ्या प्रजातीचा साप, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

सिरोंचा येथे आयटीआयमध्ये आढळला मांजऱ्या प्रजातीचा साप, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक.!

दि. ०२.०९.२०२२३

Vidarbha News India

सिरोंचा येथे आयटीआयमध्ये आढळला मांजऱ्या प्रजातीचा साप, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक.!

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली/सिरोंचा : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील सिरोंचा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २ सप्टेंबरला मांजऱ्या प्रजातीचा साप आढळून आला. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकच धावपळ उडाली. मात्र, नंतर सर्पमित्राच्या मदतीने सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात मुक्त करण्यात आले.

सिरोंचा येथील आयटीआयमध्ये एका खोलीत हा साप आढळून आला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. शिक्षक दीपराज गवळी यांनी सर्पमित्र व पोलिस अंमलदार नईम शेख यांना पाचारण केले. त्यांनी तत्काळ आयटीआयमध्ये धाव घेत स्टिकच्या सहाय्याने सापाला पकडले. यावेळी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम, वनपाल सुरेश नीलम, दामोधर चव्हाण यांच्या मदतीने नंतर या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मात्र, या सापाने आयटीआयमध्ये एकच धावपळ उडाली होती. काही विद्यार्थ्यांनी सापाचे फोटो मोबाइलमध्ये कैद केले.

काय आहे वैशिष्ट्य?

मांजऱ्या प्रजातीच्या साप हा रंगाने काळा अन राखडी आहे. शरीरावर पांढरे चट्टे आहेत. पिवळसर तपकीरी रंगाचा हा साप सिरोंचात प्रथमच आढळून आल्याचा दावा सर्ममित्र नईम शेख यांनी केला.हा साप निशाचर असल्याने आपले भक्ष्य रात्रीच्या वेळी शोधतो. तो निमविषारी आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->