शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा..!

दि.१२.०९.२०२३

Vidarbha News India

शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा..!

Nashik bans mobile phones for teachers  

विदर्भ न्यूज इंडिया 

नाशिक : मोबाईल ही काळाची गरज आहे.. संवाद साधण्यासाठी, महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. मात्र याच मोबाईलच्या वापराचा अतिरेकही दिसून येतो.

अनेक जण कुठेही, केव्हाही मोबाईल वापरतात. मात्र, त्याचा त्रास इतरांना होतो. अगदी शाळेतही मोबाईलचा वापर होऊ लागलाय. मात्र नाशिक महानगरपालिकेने यावर मोठा निर्णय घेतलाय. शाळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे.
शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हा इशारा विद्यार्थ्यांना नाही तर थेट गुरुजींनाच देण्यात आलाय. ऐकून धक्का बसला ना. मात्र, हे खरं आहे. नाशिक महानगरपालिकेने गुरुजींना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी करण्यासाठी पाऊल उचललंय. महानगरपालिकेच्या शाळेत गुरुजींना मोबाईल बंदी लागू होणार आहे.

अनेक गुरुजी शाळेमध्ये शिकवण्याऐवजी मोबाईलवर व्यस्त असतात.. मोबाईलवर बोलत राहणे, शेअर मार्केटचे व्यवहार करणे, गेम खेळणे, चॅटिंग करणे यात आपला वेळ वाया घालवत असल्याचं समोर आलंय.. त्यामुळे आता मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुजींना मोबाईल बंदी कशासाठी?

विद्यार्थ्यांना शिकवत असताना फोन आल्यावर शिकवण्यात अडचण येऊ शकतो. वर्गात मोबाईलवर बोलणा-या शिक्षकांमुळे विद्यार्थीही त्याचं अनुकरण करु शकतात. शिक्षकांसारखेच विद्यार्थीही वर्गात मोबाईल वापरू शकतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या प्रयत्नात व्यत्यय येऊ शकतो.

शाळेत येताना शिक्षकांना आपले मोबाईल मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जमा करावे लागणार

या निर्णयामुशे गुरुजींनी शाळेत येताना आपले मोबाईल मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जमा करण्याची सक्ती करण्यात आलीय.. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिका-यांनी तसे आदेशच जारी केलेत... याची अंमलबजावणीही काटेकोरपणे केली जाणार आहे.. शाळांमध्ये अचानक पाहणी करून वर्ग सुरू असताना शिक्षकांकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याआधी सोलापुरात शाळेच्या वेळेत गुरुजींना मोबाईल वापरण्यावर निर्बंध लादण्यात आलेत. त्याच्या शिक्षेचं स्वरुपही ठरवण्यात आलं होतं.

मोबाईल वापरल्यास शिक्षकांवर काय कारवाई होणार?

शाळा व्यवस्थापन समिती दंडाची रक्कम ठरवणार. पहिल्यांदा नियम मोडल्यास 100 रुपयांचा दंड वसूल करणार. दुस-यांदा नियम मोडल्यास 200 रुपयांचा दंड वसूल करणार. दोनवेळा दंडात्मक कारवाई होऊनही मोबाईल वापरल्यास मोबाईल जप्त करणार शिक्षकांना शाळेत तर मोबाईल घेऊन येता येईल. मात्र, शिकवताना किंवा शाळेच्या व्हरांड्यात मोबाईल वापरण्यास मनाई असेल.. विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेऊन याचं अनुकरण करु नये म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आलंय..

Share News

copylock

Post Top Ad

-->