वरोरा येथे राज्यस्तरीय कवी संमेलन तथा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

वरोरा येथे राज्यस्तरीय कवी संमेलन तथा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

दि. १२.०९.२०२३
Vidarbha News India
वरोरा येथे राज्यस्तरीय कवी संमेलन तथा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
विदर्भ न्यूज इंडिया            
चंद्रपूर/वरोरा : सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा गडचिरोली अंतर्गत सुशिला काव्य विचार साहित्य मंच तर्फे पहिले भव्य राज्यस्तरीय कविसंमेलन दिनांक १०/९/२०२३
रोज रविवारला नगरभवन कार्यालय वरोरा (बाजार रोड)येथे घेण्यात आले.सुशिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष मा.डॉ.प्रा.संघर्ष बळीराम सावळे,हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स स्टुंडंट ॲंम्बेसेडर ऑफ स्कॉटलंडडॉ.बा.आं.म.विद्यापीठ,छ.संभाजी नगर.उद्घाटक,
मा .प्रसन्नजीत गायकवाड,सुप्रसिद्ध साहित्यिक,समीक्षक
स्वागताध्यक्षा मा.शोभा वेले नागपूर, प्रमुख अतिथी म्हणून मा.आचार्य गो.ना थुटे,सुप्रसिद्ध साहित्यिक,समीक्षक वरोरा.मा.प्रा.मनोहर नाईक,
सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, नागपूर मा.प्रकाश दुलेवाले सर,सुप्रसिद्ध साहित्यिक,नागपूर मा .सोपानदेव मशाखेत्री, गडचिरोली,डी.बी.ए.विदर्भ प्रमुख, साहित्यिक पत्रकार
मा.कल्पना टेंभुर्णीकर, नागपूर,सुप्रसिद्ध साहित्यिका, नागपूर,मा.रामनाथ खोब्रागडे,शिक्षण विस्तार अधिकारी गडचिरोली,मा.प्रकाश खरवडे,अध्यक्ष जिल्हा ग्रामसेवक संघटना,मा.लोकेश शेंडे,ग्रामसेवक वरोरा,सत्कारमुर्ती
मा.गोकुलदास वाकडे,अध्यक्ष,सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा गडचिरोली,मा.अहेतशाम अली,माजी नगराध्यक्ष,वरोरा,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.स्वप्नील मेश्राम चंद्रपूर,कविसंमेलनाचे सुत्रसंचालन मा.नरेंद्र सोनारकर, सुप्रसिद्ध साहित्यिक,पूरोगामी पत्रकार संघ विदर्भ आणि मा.रविंद्र दयानंद राणा, मुंबई, यांनी केले.सुशिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये मा.गजानन गेडाम,गडचिरोली यांना,समाजभूषण पुरस्कार मा.गंगाधर शालिग्राम धुवाधपारे यांना समाजगौरव पुरस्कार
मा.उषा घोडेस्वार,भंडारा,काव्यरत्न पुरस्कार,मा.सरिता गव्हारे, चंद्रपूर,समाजगौरव पुरस्कार,मा.छाया टिकले, चंद्रपूर,रणरागिणी पुरस्कार,मा.कविता गेडाम, गडचिरोली
मा.मंगलाताई,पेटकर,समाजरत्न पुरस्कार,मा.सुशिला बुद्धभगवान भगत,आल्लापल्ली,समाजगौरव पुरस्कार
मा.समिर रामनाथ पिल्लेवान नागपूर,आदर्श शिक्षक पुरस्कार,मा.भास्कर अमृतसागर,धुळे,समाजभूषन पुरस्कार
कृष्णा सतिष राठोडकर लातूर,मा.उज्जवला वाल्मीक नगराळे,या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या संस्थापिका प्रियंका वाकडे/शेंडे यांच्या आर्त हुंकार या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.मा.प्रा.डाॅ.संघर्ष सावळे, सर,औरंगाबाद 
हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स स्टुंडंट ॲंम्बेसेडर ऑफ स्कॉटलंड यांनी साहित्याचे सामाजिक क्षेत्रात योगदान या विषयावर दर्जेदार आशयसंपन्न, बोधप्रद विचार मांडले.मा.प्रसनजीत गायकवाड,नागपूर यांनी साहित्यिक कसा असावा यावर मौलिक विचार मांडले,प्रा.मनोहर नाईक,सर, यांनी मौलिक मार्गदर्शन केले.मा.प्रकाश दुलेवाले सरांनी,आर्त हुंकार या विषयावर दर्जेदार समीक्षण केले. कार्यक्रमाला नागपूर, औरंगाबाद, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, अकोला, जळगाव , चंद्रपूर, भंडारा,या जिल्ह्यातील एकूण ५० साहित्यिक उपस्थित होते. वरोरा वासी साहित्यिक आणि, औरंगाबाद, नागपूर,नाशिक मुंबई अमरावती, गोंदिया, भंडारा, अकोला, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ यांची अनमोल साथ संमेलनाला लाभली. संपूर्ण आयोजक टिम आपले मनःपूर्वक आभार मानते. आपल्यामुळेच संमेलनाला अर्थ प्राप्त झाला. या संमेलणासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. गोकुलदास वाकडे संस्था उपाध्यक्ष मा. गंगा सपकाळे संस्था कोषाध्यक्ष मा. रंजीत बांबोळे तसेच संस्था सचिव तथा संस्थापिका मा. प्रियंका वाकडे शेंडे, प्रभाकर दुर्गे, संस्था सदस्य मा. लोकेश शेंडे, शालूताई वाकडे, रोशन वाकडे, किशोर देवतळे, रोहित देवतळे, या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

Share News

copylock

Post Top Ad

-->