दि. 21.10.2023
Vidarbha News India
मोठी बातमी! माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : मोठी बातमी समोर येत आहे. माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील एका गावात माओवाद्यांनी भाजप नेत्याची हत्या केली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या हद्दितील सारखेडा गावात रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बिरजू तारम असं हत्या झालेल्या नेत्याचं नाव आहे.
सारखेडा गावातील घटना
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या हद्दितील सारखेडा गावात रात्री उशिरा बिरजू तारम यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं आवाहन माओवाद्यांकडून करण्यात आलं आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा या उद्देशातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दहशत पसरवण्यााचा प्रयत्न
ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न होत असल्यानं. निवडणूक सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचं मोठं आव्हान आता प्रशासकीय यंत्रणांसमोर असणार आहे. दरम्यान जिथे बिरजू तारम यांची हत्या झाली ते ठिकाण गडचिरोली जिल्ह्यापासून अवघ्या काही किलोमीटर अतंरावर आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस देखील सतर्क झाले आहेत. सीमावर्ती भागातील हालचालींना वेग आला आहे. माओवाद्यांकडून निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा, लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी, हाच उद्देश या हत्येमागे असल्याचं बोललं जात आहे.