दि. ३१.१०.२०२३
२१ नोव्हेंबर नागपूर येथिल भव्य मोर्च्याला आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा;
- आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे प्रतिपादन
- जनजाती सुरक्षा मंच च्या वतीने देवरी येथे डिलिस्टिंग संदर्भात बैठकीचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : २१ नोव्हेंबर नागपूर येथे डिलिस्टिंग संदर्भात भव्य मोर्चाला आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपली संस्कृती रूढी परंपरा यांचे रक्षण करण्याकरिता धर्मांतरित लोकांना आरक्षण बंद करण्याकरिता २१ ला नागपूर मध्ये होत असलेल्या भव्य मोर्च्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी व्यक्त केले*.
मंचावर माजी आ. संजयजी पुराम, बाळाभाऊ अंजनकर, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भास्करजी रोकडे, यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी निताताई कीटकरू, जनजाती अध्यक्ष डॉ. नाजूकराव कुमरे, नगराध्यक्ष उईकेजी हनुमंतू वट्टी, रितरक्षा प्रमुख श्रीधर जी, शंकर निनावे, तालुका कार्यवाह सुरेश चन्ने, कुलदीप लांजेवार, विलास शिंदे, राकेश गहाणे, चंद्रभान धोंडरा, अरुणजी, मुकेश इनवते, संजू उईके, देवेंद्र नैताम, दिलीप मानकर, प्रल्हाद वरठे, नामदेव आयले, शिवशंकर कवठे, आदिवासी आघाडी अध्यक्ष सरोज परतेती, बलवंत उईके, विठ्ठल गावळ, लोकनाथ तितराम, सुरेंद्र परतेती, मनलाल मरस्कोल्हे, शामकला गावळ, तथा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.