दि. ३१.१०.२०२३
मालेवाडा येथे परिवर्तन विकास पॅनल चा प्रचाराचा शुभारंभ...
रजत डेकाटे // प्रतिनिधी नागपूर
विदर्भ न्यूज इंडिया
भिवापूर : मालेवाडा येथील परिवर्तन विकास पॅनल चा शुभारंभ दि.२९ रविवार सका ९ वाजता सार्वजनिक हनुमान मंदिर मालेवाडा येथून ते गंगा माता मंदिर, नदी जवळ असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सर्व परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांनी पुजा अर्चा केली.
यात मालेवाडा येथील भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केली.
यात परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांनी सर्वतोपरी विकास करण्याचा निर्णय परिवर्तन विकास पॅनलने घेतला.
इतकेच नव्हे तर श्रीक्षेत्र हनुमान मंदिर मुचेपार येथे जाऊन सर्व परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांनी हनुमंताची पुजा अर्चा केली व गावाच्या विकासासाठी आम्हाला जनतेची सेवा करायची आहे अशी मागणी परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांनी मुचेपार येथील बजरंगबलीला केली.