दि. ३१ ऑक्टोंबर २०२३
नोंदणीकृत देवस्थान व धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाचा साडी वाटप कार्यक्रम अभिनंदनीय ; - आमदार डॉ. देवरावजी होळी
- धर्मादाय सह आयुक्त कार्यालय नागपूर व नोंदणीकृत देवस्थानच्या वतीने मार्कंडा देवस्थान येथे साडी वाटप कार्यक्रम
- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचेसह धर्मादाय सह आयुक्त नागपूर यांची उपस्थिती
- २२ जानेवारी रोजीच्या श्रीराम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला विशेष उल्लेख.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : मा. श्री महेंद्रजी महाजन धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मार्गदर्शनानुसार धर्मादाय सह आयुक्त कार्यालय नागपूर व सार्वजनिक नोंदणीकृत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मार्कंडा देवस्थान ता. चामोर्शी येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी व धर्मदाय सह आयुक्त श्रीमती सुनिता तरार यांच्या शुभ हस्ते साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा साडी वाटप कार्यक्रम खरोखरच अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन आमदार महोदयांनी याप्रसंगी केले.
यावेळी उपस्थित माता-भगिनींना मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, धर्मादाय आयुक्त कार्यालय व नोंदणीकृत देवस्थानाच्या वतीने गरीब गरजू महिलांना साडी वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. याबद्दल आमदार महोदयांनी नोंदणीकृत देवस्थान व धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाचे विशेष अभिनंदन केले. तसेच येणाऱ्या २२ जानेवारी २०२४ ला श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत असून या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आपणही आपल्या जिल्ह्यामध्ये या महासोहळ्याचे साक्षीदार होऊन उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक श्री देऊळकरजी, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजाननजी भांडेकर, लघुलेखक हेमंत शेरकी, निरीक्षक आनंदचंद बांदे , उमेश शिंगाडे, किशोर रंगारी रोशन मडावी, श्याम खंदारे,अनिल भाडेकर ,संदीप कांबळे,लिपीक तोषिक बोरकर, निरीक्षक प्रकाश कांबळे, जावेद पठाण, अजय खानोरकर, श्याम खंडारे, , सिपाही सिद्दी ताठे, गणेश टेकाम यांचे सह धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.