दि. २४.१०.२०२३
दसरा सण हा दृष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवणारा दिवस; - आ. डॉ. देवरावजी होळी
- समस्त जनतेला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्या..💐
- दसऱ्याच्या शुभ प्रभावर गोटुल भूमीवर आदिवासी देवी देवतांची महापूजा संपन्न
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : दसरा हा सण दृष्ट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय मिळवणारा दिवस असून आपणही आपल्या जीवनामध्ये वाईट प्रवृत्तींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा अंगीकार करावा असे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी चांदाळा रोड गडचिरोली येथील गोटुल भूमीवर आयोजित आदिवासी देवीदेवतांच्या महापुजेच्या प्रसंगी केले.
याप्रसंगी खासदार अशोकजी नेते गोटुल समितीचे जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ नरोटे, सेवानिवृत्त इंजिनिअर माधवरावजी गावळ, गोटुल समितीचे सचिव मोहन भाऊ पुराम, वेलादी सर,भूमकाल पुजारी, यांचे सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्हावासियांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.