दि. २६.१०.२०२३
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीचा शिक्षकांच्या प्रलंबित समस्यां संदर्भात सातत्यपुर्ण पाठपुरावा - मा.मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्री ठाकुर साहेब जि.प.गडचिरोली यांचेशी चर्चा करतांना शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर सर
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीचे वतीने जिल्हाध्यक्ष श्री. रघुनाथ भांडेकर सर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. राजेश चिलमवार सर,जिल्हा सल्लागार श्री. जनार्दन म्हशाखेत्री सर,मुलचेरा तालुका संघटक श्री. सुजय सरकार सर,यांनी मा.मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्री.ठाकुर साहेब, मा.शिक्षणाधिकारी श्री. विवेक नाकाडे साहेब,मा.सहायक प्रशासन अधिकारी श्री.धनंजय दुम्पेंटीवार साहेब, लेखा तथा वित्त विभागातील श्री विजय मुडपलीवार साहेब,श्री बोधनकर साहेब जिल्हा परिषद गडचिरोली यांची दिनांक - 23/10/2023 ला प्रत्यक्ष भेट घेऊन दि. 20/09/2023 च्या सभेत चर्चा करण्यात आलेल्या शिक्षक संवर्गांच्या प्रलंबित असलेल्या खालील समस्यांसंदर्भात पाठपुरावा करण्यात आला.
1 जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे माहे ऑक्टोबर 2023 चे वेतन व दिपावली सन अग्रीम 5 नोव्हेंबर पुर्वी अदा करण्यात यावे.
2.जिल्हातील शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,उच्च श्रेणी मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक आदी रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे.
3.जिल्हांतील प्राथमिक शिक्षकांची प्रलंबित असलेली सर्व प्रकारची थकीत बिले निकाली काढण्यासाठी आवश्यक असलेली निधीची तरतूद पं.स.स्तरावर त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावी.
4.जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत पात्र शिक्षकांना निवडश्रेणी चा लाभ त्वरीत देण्यात यावे. 5.प्रलंबित असलेली G.P.F.ची नापरताना प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात यावे.जसे- श्री अशोक रायसिडाम सर व इतर.
6.श्रीमती ज्योतिका दशरथ नैताम पं.स.अहेरी यांचे G.P.F./N.P.S.खाते त्त्वरीत काढण्यात यावे. 7.श्री निलकंठ आवारी सर पं.स.गडचिरोली यांची पाचव्या वेतन आयोगची रक्कम त्यांच्या G.P.F. खात्यात जमा करण्यात यावी.याप्रसंगी लेखा विभागातील संबंधित कर्मचारी वृंद उपस्थित होते.
निवडश्रेणीची फाईल G.A. D.मध्ये पाठविण्यात आलेली आहे. केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक ची पदे भरण्यासाठी ची कार्यवाही सुरू असुन, सदर पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
माहे ऑक्टोबर 2023 चे वेतन नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच दिपावली सण अग्रीम ची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
श्रीमती ज्योतीका दशरथ नैताम मॅडम यांचे G. P. F./N. P. S.खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
श्री निलकंठ आवारी सर यांची पाचव्या वेतन आयोगची रक्कम शोधण्यासाठी संबंधित पं.स.कडून जि.प.कडे रक्कम पाठविले असल्याचे कागदपत्रे मागविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.