दि. २५.१०.२०२३
घर जळलेल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात, पालकमंत्र्यांनी केले सहकार्य
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोभुर्णा : तालुक्यातील देवाडा बुज येथील घनश्याम ठुमदेव घोटेकर यांच्या घराला काही दिवसांपूर्वी आग लागल्याने संसार उपयोगी वस्तू जळुन खाक झाले. अशा बिकट परिस्थितीत सदर पिढीत व्यक्ती आर्थिक संकटात सापडला होता सदरची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना मिळताच त्यांनी भाजपा कार्यकर्ते यांना घरी पाठवून पिढीत कुटुंबाच्या मदतीला धावुन येत आर्थिक मदत तात्काळ केली. त्यामुळे कुटुंबात समाधान व्यक्त करुन दिलासा मिळाला आहे. यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री कु अल्का आत्राम, निराधार योजनेचे अध्यक्ष तुळशीराम रोहनकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अजय म्हस्के गावचे कार्यकर्ते थोवाजी घोटेकर , विनोद मारशेटीवार, सामाजिक कार्यकर्ते विकास शेडमाके व अन्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.