दि. २८.१०.२०२३
Vidarbha News India
Accident News : समृद्धी महामार्गावर चालत्या ट्रकने घेतला पेट, जिवीत हानी टळली.!
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे/कारंजा : समृध्दी महामार्गावर पुणे वरून चंद्रपूर साठी जात असलेल्या ट्रकचा समोरचा टायर फुटल्याने,ट्रक रस्ता दुभाजकाला धडकला व घर्षणाने डिझेल टॅंकने पेट घेतल्याने संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला,ट्रक जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जिवीत हानी मात्र झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार समृद्धी महामार्ग लोकेशन 163 दोनद हद्दीमध्ये ट्रकचा अचानक समोरचा टायर फुटल्याने ट्रक डिव्हायडरला घर्षण झाला व त्यामुळे ट्रकला आग लागली त्यामध्ये ट्रक पूर्णपणे जळाला.
ट्रकने पेट घेतात चालकाने व क्लिनरने ट्रक मधून उडी मारून आपला जीव वाचविला. घटनेची माहिती कैवल्य करडे यांनी गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना देताच त्यांनी समृद्धी महामार्ग लोकेशन 108 पायलट विधाता चव्हाण यांना घटनेची माहिती दिली असता लगेच अग्निशामक व रुग्णवाहिका घटना स्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले.