गडचिरोली : शेतकरी दाम्पत्याची कन्या होणार डॉक्टर... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : शेतकरी दाम्पत्याची कन्या होणार डॉक्टर...

दि. ९ ऑक्टोंबर २०२३ 

Vidarbha News India 

गडचिरोली : शेतकरी दाम्पत्याची कन्या होणार डॉक्टर...

Daughter of farmer couple 

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली/चामोर्शी : मनी निश्‍चित ध्येय व ते ध्येय गाठण्याची जिद्द असली तर काहीच अशक्य नाही, हे अक्षता मेश्राम यांनी शेतकरी दाम्पत्याच्या मुलींने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

तालुका मुख्याल्यापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण अशा सोमनपल्ली येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी अक्षता सुरेश मेश्राम हिला कोणत्याही प्रकारच्या सुविधा व शैक्षणिक वलय नसताना जिद्द, चिकाटी, आत्मविश्‍वासच्या बळावर नीट पात्रता परीक्षेत उत्तम गुण मिळवत एमबीबीएसला निवड सार्थ ठरवली आहे. ही बाब शेतकरी कुटुंबासाठी कौतुकास्पद तर गावासाठी गौरव वाढवणारी ठरली आहे.

सोमनपल्ली खेडेवजा गावात अक्षता मेश्राम यांचा माधुरी व सुरेश मेश्राम या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला. अक्षताचे गावातच प्राथमिक शिक्षण झाले. यानंतर माध्यमिक शिक्षण गडचिरोली येथील संजीवनी विद्यालयात झाले. दहावीत 83 टक्के प्राप्त करीत प्राविण्य पटकाविले. यानंतर शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे 12 वीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीला 82 टक्के गुण मिळाले. लहान वयापासून अक्षता अभ्यासात हुशार होती. daughter of farmer couple कठोर परिश्रम घेत वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेची नीट परीक्षा शिकवणी न लावता उत्तीर्ण केली. तिने एमबीबीएससाठी अमरावती कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. गावातील शेतकरी कन्येने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यशोशिखर गाठल्याने कुटूंबियांसाठी ही बाब अभिमानास्पद ठरली आहे. तर तिच्या या यशाने गावातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. ग्रामीण भागातून आलेल्यान अक्षताच्या यश यशाने गावाच्या शैक्षणिक वैभवात भर पडली असून ग्रामस्थांद्वारे तिचे विशेष कौतूक होत आहे.

ग्रामस्थांद्वारे सत्कारअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटीच्या भरवशावर गावातील मुलीने डॉक्टर पदापर्यंतचे यशोशिखर गाठल्याने ही बाब संपूर्ण ग्रामस्थासाठी अभिमानास्पद ठरली आहे. याबद्दल ग्रापं सोमनपल्लीच्या वतीने अक्षताचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच निळकंठ निखाडे, मुख्याध्यापक मशाखेत्री, ग्रामपंचायत सदस्य रुपाली आखाडे, पोलिस पाटील भंडारे, ज्योत्स्ना मेडपल्लीवार, शीतल अवथरे, सुनीता देठेकर, सपना अंगलवार, रेखा नागुलवार, वनिता जंपलवार, तारा ठाकरे, सिंधू किनेकर, शालू सरवर, जिजा ठाकरे, लता पेदीवार, कविता करपले, माधुरी गावडे, विमल मडपने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->