दि. ९ ऑक्टोंबर २०२३
Vidarbha News India
पुलावरील खड्डा चुकवताना बाप लेक वैनगंगा नदीत कोसळले, गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील घटना.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : पुलावरील खड्डा चुकवताना दुचाकी थेट वैनगंगा नदी पात्रात कोसळल्याची धक्कादायक घटना काल दुपारच्या वेळेस घडली. दुचाकीवर बाप-लेक होते. बापाला वाचविण्यात यश आले असून मुलगा वाहून गेल्याची ही दुर्दैवी घटना चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा पुलावर घडली.
किशोर वासेकर असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. या मार्गावरील खड्ड्यांमूळे अपघातांची संख्या वाढली असून यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. पुलावरील एका खड्याने बाप-लेकावर मोठे संकट कोसळले. गोंडपिपरी येथील काम आटोपून गडचिरोली जिल्हातील कुणघाडा येथे दुचाकीने गणपती वासेकर व मुलगा किशोर निघाले होते. चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदी पुलावरून जात असताना पुलावरील खड्डा वाचवीताना त्यांची दुचाकी थेट नदी पात्रात कोसळली. पुलावरून ये-जा करणाऱ्या काही प्रवाशी मदतीला धावून गेले. गणपती वासेकर यास नदी पात्रातून बाहेर काढण्यात यश आले मात्र त्यांचा मुलगा किशोर पाण्याचा प्रवाहात वाहून गेला.
या मार्गाने मोठ्या प्रमाणात सुरजागडातील जड वाहने धावतात. चालकाकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. या मार्गावर सुरजागड येथील वाहनांनी झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवा लागला आहे.