दि. १५.१०.२०२३
पुढील आठवड्यात खड्डे बुजवण्याचे काम पुर्ण होणार; आंदोलनाला यश...
- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वातील भेंडाळा येथील चक्काजाम आंदोलनाला यश
- रस्ता चक्काजाम आंदोलनानंतर यांना प्रशासनाचे आश्वासन
- १९ करोड १० लाख रुपयांच्या या रस्ता बांधकामाला मंजुरी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : २०२१,२०२२,२०२३ च्या अर्थसंकल्पातून, नाबार्ड केंद्रीय मार्ग निधी, हायब्रीड निधीतुन चामोर्शी तालुक्यात मंजूर केलेल्या ३६७ कोटी २६ लाख रुपयांची कामेही लवकरच सुरू होणार
७० वर्षाच्या काळात कोणत्याही लोकप्रतिनिधीने एवढा विकास निधी आणला नसल्याचा केला दावा
मागील काही दिवसांपासून मागणी करूनही चामोर्शी-हरणघाट मुख्य रस्त्यावरील खड्डे न बुजवल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शुक्रवार पर्यंत खड्डे बुजवण्याचा प्रशासनाला चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. तरीही खड्डे बुजवण्यात न आल्याने अखेर भेंडाळा बस स्टॅन्ड जवळील मुख्य रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाला तातडीने खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन उभारले जाईल असा सज्जड भरला असता येत्या ४-५ दिवसात खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दहेगाव - चाकलपेठ ३ किलोमीटर अंतरच्या रस्त्याला ५ कोटी ४० लाख रुपये, आष्टी टी पॉइंट चामोर्शी ते दहेगाव १.५ किलोमीटर चा रस्ता १ कोटी २० लाख रुपये,फोकुर्डी- भेंडाळा २.८ किलोमीटर रस्त्याला ६ कोटी ९९ लाख रुपये, वाघोली फाटा ते भेंडाळा १.२ किलोमीटर रस्त्याला ३ कोटी रुपये, हरणघाट वैनगंगा नदीवरील पुल ते दोटकुली १.८ किलोमीटर च्या रस्त्याला २ करोड ५० लाख असे एकूण १९ करोड १० लाख रुपये या रस्त्यांच्या बांधकामाला मंजूर झाले असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी यावेळी दिली.
या रस्त्यावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर चालणार असून त्याकरिता रस्त्याची बेसमेंट भविष्यात खराब होऊ नये याकरिता मुख्य अभियंता नागपूर यांच्याकडून (थिकनेस फॉर कॅपॅसिटी बियरिंग) करिता नवीन डिझाईन तयार करण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली. त्याचबरोबर चामोर्शी तालुक्यात २०२१,२०२२,२०२३ च्या अर्थसंकल्पातून, नाबार्ड केंद्रीय मार्ग निधी, हायब्रीड निधीतुन ३७८ कोटी २६ लाख रुपयाचा निधी आपण मंजूर केला असून मागील ७० वर्षाच्या काळात आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही लोकप्रतिनिधीने विकासासाठी निधी आणला नसल्याचा दावा आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी केला.
या आंदोलनाच्या प्रसंगी जिल्हा भाजपा सचिव दिलीपजी चलाख, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, संतोषजी सुरावार ,भाऊजी दहेलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भोजराज भगत, संजय खेडेकर, भुवनेश्वर चूधरी ,रवी थोटे, उमेश पिठाले रामचंद्र वरवाडे, प्रतीक राठी ,संजय चौधरी,दिपक वासेकर डोमदेव वन्नेवार, उमेश कुकडे, संजय चलाख, अतुल भिरकुरवार, नरेंद्र पोरटे,राजू पोरटे, नाजूक पोरटे, दीपक वासेकर, राजू मोगरे, मंगेश बोधलकर, आनंदराव सातपुते, लक्ष्मणराव सातपुते, खुशाल सातपुते, लोकाजी गवारे, साईनाथ गवारे, पंकज कोठारे यांचे सह परिसरातील नागरिक जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.