दि. २७.१०.२०२३
आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी डि-लिस्टिंग करणे आवश्यक ; - आमदार डॉ. देवरावजी होळी
- विदर्भ वनवासी कल्याण आश्रम कुरखेडा येथे डि लिस्टिंग संदर्भातील बैठक संपन्न !
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : परंपरेने महान असणारा आदिवासी समाज सोडून काही लोक इतर धर्मांत जातात मात्र सर्व सोयी सुविधांचा लाभ याच मूळ आदिवासीं समाजाचा घेतात यामुळे आदिवासीं समाजावर फार मोठा अन्याय होत आहे. त्यामूळे अशा लोकांचे आदिवासी समाजातून डि-लिस्टिंग करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विदर्भ वनवासी कल्याण आश्रम कुरखेडा येथे यासंदर्भात आयोजित बैठकीच्या प्रसंगी केले.
बैठकीला भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे, जिल्हा संघटन मंत्री मनोज करिहरता, प्रांत खेलकूद प्रमुख पंढरीजी दर्रो, प्रान्त हितरक्षा प्रमुख भगीरथ बेचनकृवर, जिल्हा खेलकूद प्रमुख गिरीश टेकाम, जिल्हा सहसचिव उमेश मडावी, प्रान्त महिला प्रमुख जास्वंदाताई दर्रो, विभाग प्रमुख (बालसंस्कार ) लक्ष्मीताई बोग उपस्थित होते.