दि. ७ नोव्हेंबर २०२३
आमदार ,खासदारांसाठी नाही तर भाजपा पक्षासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे; आ.डॉ. देवरावजी होळी
- जिल्हा प्रभारी बाळाभाऊ अंजणकर यांच्या उपस्थितीत चामोर्शी येथे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बूथ पालकांचा मेळावा
- २०२४ मधील लोकसभा जिंकायची असेल तर आता पासुन गतीने कामाला लागावे लागेल. आमदारांचे आवाहन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : येणारे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून या निवडणुका जिंकायच्या असतील तर आता पासुन गतीने कामाला लागावे लागेल.आमदार, खासदारांसाठी नाही तर कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीसाठी काम करावे लागेल तरच आपल्याला आपले लक्ष साध्य करता येईल म्हणून कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथील आयोजीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बूथ पालकांच्या मेळाव्याप्रसंगी केले.
यावेळी जिल्हयाचे प्रभारी बाळाभाऊ अंजणकर, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जेष्ठ नेते रमेशजी भूरसे, महीला मोर्चाच्या अध्यक्षा गीता ताई हिंगे, ओबिसी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ पोहनकर, चामोर्शी तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर, गडचिरोली तालुका अध्यक्ष, लताताई पुंघाटे तालुका अध्यक्ष धानोरा, जिल्हा सचिव दिलीप चलाख, प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्नील वरघंटे, गोंदिया जिल्हयाचे प्रविनजी दहिकर, प्रामुख्यानं मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. देवरावजी होळी म्हणाले की, मागील ६५ वर्षात जेवढा निधी या क्षेत्राच्या विकासासाठी आणला नाही तेवढा निधी आपण या ९ वर्षाच्या कालावधीत आणला. केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांना समजावून सांगावे लागेल आजच्या काळात आपणाला सोशल मीडिया, प्रसार माध्यम आणखी प्रभावी करावे लागेल, नवमतदार नोंदणी करावे लागेल, बूथ सशक्तीकरण करावे लागेल, १+३० बूथ रचनेला काम द्यावं लागेल, मोदी आवास योजनेचा लाभ सामान्य जनतेला मिळावा यासाठी आपल्याला आणखी गतीने काम करावे लागेल. त्याकरिता सर्वानी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बूथ मेळाव्याला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बूथ पालक प्रामुख्याने उपस्थित होते.