सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने मुख्याधापिका संतापल्या; आणि त्यानंतर... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने मुख्याधापिका संतापल्या; आणि त्यानंतर...

दि. ७ नोव्हेंबर २०२३ 

Vidarbha News India 

सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने मुख्याधापिका संतापल्या;  आणि त्यानंतर...

Chandrapur News: २३ विद्यार्थिनींना केली भयंकर शिक्षा.!, पालकांनी अधिकाऱ्यांकडे केली तक्रार.! 

विदर्भ न्यूज इंडिया 

चंद्रपूर शहरातील एका शाळेत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळकरी विद्यार्थिनींच्या एका चुकीमुळे त्यांना विचित्र शिक्षा दिली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी विद्यार्थिनींना तासभर बाथरूममध्ये डांबून ठेवलं होतं.

बाथरूममध्ये अस्वच्छता असल्याने काही विद्यार्थिनींना याचा त्रास झाला. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने शिक्षा म्हणून मुख्याध्यापिकांनी २३ शाळकरी विद्यार्थिनींना अशी वागणूक दिली. तासाभराने मुलींची सुटका झाल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींना उलट्या देखील झाल्या.

इयत्ता ७ वी ते १० वीच्या एकूण २३ विद्यार्थिनींना शाळेच्या बाथरूममध्ये डांबण्यात आलं होतं. जेव्हा मुलींनी याची तक्रार शिक्षकांकडे केली, तेव्हा त्यांची मदत करण्याऐवजी खिल्ली उडविली गेली. त्रस्त मुलींनी पुढे त्यांच्या पालकांना घडलेल्या या प्रकाराची हकीकत सांगितली.

पालकांनी युवासेनेकडे ही माहिती दिली. नंतर युवासेना कार्यकर्ते आणि पालक घटनास्थळी पोचले आणि आंदोलन केले. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शाळेने आपली चूक मान्य देखील केली आहे. त्यानंतर मुख्याध्यापिकांनी शिक्षाम्हणून केलेल्या कृत्याची कबुली दिली. घटनेबाबत जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->