दि. ४.११.२०२३
बँक ऑफ इंडिया तर्फे दक्षता जागरुकता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/ चंद्रपूर :मुल : मुल तालुक्यातील बेंबाळ याठिकाणी बँक ऑफ इंडियाची शाखा सदैव जनतेसाठी कार्यरत असुन, सदर बँके तर्फे नुकतेच दक्षता जागरुकता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला होता. सदर सप्ताह मोहीम ही दिनांक 30 आकटोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान आपल्या विकसित देशात " भष्टाचार मुक्त भारत" ही संकल्पना व घोषवाक्याचा वापर करून दक्षता जागरुकता सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहाच्या सुरुवातीला बेंबाळ बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक राहुल लांजेवार यांनी बँकेच्या कार्यालयात बँक कर्मचाऱ्यांना पारदर्शकता, नैतिकता, सचोटीची शपथ देऊन सप्ताहाचा श्रीगणेशा करण्यात आला. सप्ताह दरम्यान बँकेचे साहयक व्यवस्थापक मंगेश गेडाम तसेच कृषी अधिकारी सौ. अपुर्णा ढेले यांनी जुनासुरला व जुनगाव याठिकाणी ग्रामसभा आयोजित करुन जनहित प्रकटीकरण व माहिती देणारयांचे संरक्षण त्याच प्रमाणे संरक्षण कायदा अधिनियम 2004 ची माहिती ग्रामवासीय जनतेला देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधान मंत्री जनसुरक्षा, बँक कर्ज समझोता इत्यादी शासकीय योजनेची माहिती जनतेपर्यंत प्रधान करून अधिका अधिक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी जुनासृला येथील सरपंच रंजित समर्थ उपसरपंच गणेश गोवर्धन, श्री घनश्याम दयालवार, कुमार गांगुलवार, सुरज कोटलवार व अन्य नागरीक उपस्थित होते.