दि. १६. ११.२०२३
माडे आमगांव येथे बिरसा मुंडा जयंती पारंपरिक नृत्यासह मोठया उत्साहाने साजरी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील माडे आमगांव येथे आदिवासी समाज व समस्त गावकरी मिळून क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा मोठ्या उत्साहाने साजरी केली.
आदिवासी जनायक, स्वातंत्र्य सैनिक, क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यात रांचीच्या ऊलीहातू गावात सुगना मुंडा व करमी हातू यांच्यापोटी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरसा यांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी होती. इंग्रज आपल्या समाजावर अन्याय करीत आहेत, अशी त्यांची भावना होती. त्यातून त्यांनी आदिवासी समाजातील युवकांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. १८९७ ते १९०० या काळात इंग्रज सैनिक व आदिवासी यांच्यात युद्ध झाले. त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांच्याकडे होते. आदिवासी बिरसा यास धरती आबा या नावाने ओळखले जात होते. रांची येथील कारागृहात ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडांचे निधन झाले. तेव्हापासून बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाते. त्यानंतर बिरसा मुंडा यांच्या नावाने रांची येथील कारागृहाचे व विमानतळाचे नाव ठेवण्यात आले. बिरसा मुंडा यांनी आपल्या आदिवासी समाजाला शिक्षण घेण्यासाठी प्रेरीत केले. आपल्या देशातील 'जल जंगल जमीन' वरील अधिकार भांडवलशाही सावकार व जमीनदार लोकं तसेच ब्रिटिश सरकार आदिवासीच्या जमीनी हडपली. आपले वन हक्क अधिकार मिळवण्यासाठी त्यांचे संघर्ष सुरू होते. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आदिवासींना संघटित करून स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान भगवान बिरसा मुंडा यांनी दिलंय. त्यांच्या ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा पत्रकार संपादक, सामाजिक कार्यकर्ता राजेशभाऊ रामदास खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक विलास सोमा नरोटे, रामदास पाटाळी नरोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल पुंगाटी (सरपंच), प्रमुख मार्गदर्शक श्री.मा. राजेशजी रामदास खोब्रागडे, रामदास पुंगाटी (घोट ईलाका), कार्यक्रमाची प्रास्ताविक रामदास डी. नरोटे सर ( शिक्षक) यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शारदाताई तावाडे (उपसरपंच) भाग्यश्रीताई गणवीर, मंचू पुंगाटी, शामराव पुंगाटी, सुधाकर तीम्मा, दिलीप नरोटे, दिलीप फुलझले, अशोक मेश्राम, मधुकर कुरखेडे, चंद्रशेखर वनकर, राकेश चांदेकर, बालाजी नरोटे, धर्मा हिचमी, सोमा कंगाली, व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शेखर कंगाली, रोशनी नरोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता रावजी मोहंदा, संतोष परसा, संजय सरवर, जाकेश नरोटे, सदाशिव, पुंगाटी, विनायक नरोटे, सदू नरोटे, नंदू तीम्मा, संतोष नरोटे, गिरजाबाई नरोटे, व बहुउद्देशीय क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा मंडळातील सर्व सदस्य मूल मुली यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन संतोष परसा यांनी केले.