रायपूर (कारवाफा)येथील १५ नोव्हेंबरच्या पुतळ्यांचे लोकार्पण व महानाट्याला लोकांनी आवर्जून यावे; - आ. डॉ. देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

रायपूर (कारवाफा)येथील १५ नोव्हेंबरच्या पुतळ्यांचे लोकार्पण व महानाट्याला लोकांनी आवर्जून यावे; - आ. डॉ. देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन

दि. १३ नोव्हेंबर २०२३ 
Vidarbha News India 
रायपूर (कारवाफा)येथील १५ नोव्हेंबरच्या  पुतळ्यांचे लोकार्पण व महानाट्याला लोकांनी आवर्जून यावे; - आ. डॉ. देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन
- १५ नोव्हेंबरला रायपूर (कारवाफा) येथे सल्लागागरा,विर बाबूरावजी शेडमाके व बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांचे लोकार्पण व भगवान बिरसा मुंडा महानाट्याचे आयोजन
- आदिवासी पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली  : दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे मुळगाव मौजा रायपुर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सल्लागागरा ,वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण व धरती आबा बिरसा मुंडा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बांधवानी आवर्जून यावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या माध्यमातून केले आहे.
पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा नामदार धर्मरावबाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, आमदार डॉक्टर देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, आमदार बंटी भाऊ भांगडिया यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. अनिरुद्ध वनकर ,चुडाराम बल्लारपूरे लिखित धरती आबा बिरसा मुंडा या महानाट्याची आयोजनही ग्रामसभा रायपूरच्या वतीने करण्यात आले आहे. सोबत सायंकाळपासूनच पारंपारिक आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाकाही त्या ठिकाणी होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ जिल्ह्यातील जनतेने अवश्य घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जनतेला केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->