दि. २६ नोव्हेंबर २०२३
भारतीय जनता पार्टी उमरेड च्या वतीने संविधान दिवस साजरा.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/नागपूर : रजत डेकाटे
उमरेड : उमरेड येथील भारतीय जनता पार्टी वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. उमरेड येथील तहसील जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी आमदार सुधीर पारवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. व डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय आणि संविधान दिन चिरायू होवो अश्या घोषणा घेण्यात आल्या.
यावेळी डॉ.शिरीषजी मेश्राम, डॉ.मुकेश मुदगल, सुभाष कावटे,
सतीश चौधरी,उमेश हटवार, अरविंद हजारे,विलास मेंढे,उमेश वाघमारे,तुषार ढोरे, रमित राहटे,विनय बुतोलिया,देवानंद गवळी,प्रकाश कटारे,सुजित कुरुटकर,आकाश इनकने,मयाताई पाटील,अर्चना बगडे,शालिनी गवळी,सीमा कांडाळकर किरण मेश्राम,पुष्पा कारगावकर आदींची उपस्थित होते.