दि. 26.11.2023
हत्ती ने मरेगाव येथील युवकास चिरडले.! 302 अंतर्गत गुन्हे दाखल करा; जिल्हा काँग्रेसची मागणी.!
- वनअधिकाऱ्यावर 302 अंतर्गत गुन्हे दाखल करा.!
- गडचिरोली जिल्हा काँग्रेसची मागणी.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाच्या हल्यात वाढ झाली आहे, त्यामुळे शेती आणि गावातील घराची प्रचंड नुकसान होत आहे, त्याहीपेक्षा या हल्यात अनेक निरपराध नागरिकांचा जिवही जात आहे, याचे मुख्य कारण म्हणजे वनविभागाकडे ड्रोन कॅमेरे असताना देखील, जंगली हत्तीची करंट लोकेशन शेतकऱ्यांना दिल्या जात नसल्याने गावात किंवा गावाशेजारी हत्ती आणि वाघ येत असल्याची पुरेपूर माहिती लोकांना मिळत नाही, आणि याला पूर्णता वनविभागातील अधिकारीच जबादार आहे, ह्या अधिकाऱ्याच्या निष्काळजी पणामुळे नुकताच मरेगाव येथील तरुणाचा जीव गेला, त्याच्या मृत्यूला जबाबदार धरून गडचिरोली वन विभागाचे मुख्यवनरक्षक, उपमुख्यवनरक्षक यांच्यावर भादवी 302 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षक गडचिरोली यांच्या कडे करण्यात आली आहे.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, जिल्हाउपाध्यक्ष समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सोशल मीडिया अध्यक्ष संजय चंने, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सुरेश भांडेकर, हरबाजी मोरे, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्पनाताई नंदेश्वर, ढिवरू मेश्राम, नृपेश नांदनकर, शत्रूघण चौधरी, उत्तम ठाकरे, लालाजी सातपुते, धम्मदीप सहारे, राज डोंगरे, नितेश राठोड, सुधीर बांबोळे, जावेद खान, रुपेश सलामे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.