दि. 26.11.2023
Vidarbha News India
'पोलीस स्टेशन मुलचेरा' पोलीसांनी अवैध दारुसह केला 7,76,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.!
- दारु वाहतुकीसाठी आरोपीची लढवलेली शक्कल पोलीसांनी केली उघड.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत दिलेल्या आदेशान्वये काल दिनांक 25/11/2023 रोजी सकाळी 06 वा. एक पिकप नंबर एम. एच. 34 बि. झेड. 3157 या वाहनातुन अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली असल्याने पोलीस स्टेशन मुलचेरा येथील अधिकारी अंमलदार यांनी नाकाबंदी करुन ये-जा करणा-या वाहनास थांबवुन सदर वाहनाची तपासणी केली असता व वाहनाचे डाल्यामधील काही भाग हा वेल्डिींग करुन त्याच्या आतमध्ये काही बॉक्स ठेवलेले दिसुन आले तसेच सदर वाहनाची पाहणी केली असता सदर बॉक्समध्ये देशी व विदेशी दारु मिळुन आले.
सदर तपासणी दरम्यान 1) रॅकेट देशी दारु प्रवरा डिस्टिलरी कंपनीचे 31 बॉक्स प्रति मध्ये 90 एम. एल. मापाचे 100 निपा असे एकुण 3100, प्रतिनग 70 रुपये प्रमाणे, किंमत 2 लाख 17 हजार रुपये, 2) इम्पेरियल ब्ल्यु कंपनीचे 04 बॉक्स प्रति बॉक्स मध्ये 750 एम. एल. मापाच्या 12 बॉटल असे एकुण 48 बॉटल प्रति बॉटल विक्री किंमत 1400 रुपये प्रमाणे किंमत 67,200 रुपये, 3) हायवर्ड 5000 बियर कंपनीचे तीन बॉक्स प्रति बॉक्स मध्ये 500 एम. एल. मापाच्या 24 कॅन एकुण 72 कॅन प्रति विक्री किंमत 350 रुपये प्रमाणे 25,200 रुपये, 4) टुबर्ग स्ट्राँग बियर कंपनीचे दोन बॉक्स प्रति बॉक्स मध्ये 500 एम. एल. मापाच्या 24 कॅन असे एकुण 48 कॅन प्रति कॅन विक्री किंमत 350 रुपये प्रमाणे किंमत 16,800 रुपये, 5) एक टाटा योध्दा 1700 कंपनीचे चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. 34 बी. झेड. 3157 किंमत अंदाजे 4,50,000/- हजार रुपये असा एकुण अंदाजे 7,76,200/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर वाहनातील आरोपी 1 ) नामे प्रशिल शंकर ढोले 2) तेजस हंसराज गिरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फरार आरोपी अरविंद निवेलकर राहणार जंगम वस्ती चंद्रपुर ह. मु. घोट ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील असुन फरार आरोपीचे शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मा. वरीष्ठंाचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मुलचेरा येथील पोउपनि संदिप ठाकरे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मुलचेरा प्रभारी अधिकारी सपोनि. अशोक भापकर व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
तसेच यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी सांगितले की, गडचिरोली पोलीस दल हे आरोपीच्या नेहमीच एक पाऊल पुढे चालत आहे. सदर वेळी आरोपीने खुप शक्कल लढवुन पोलीसांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न केला परंतु गडचिरोली पोलीस दलाने त्यांचा तो प्रयत्न हाणुन पाडला आहे. तसेच जिल्ह्रातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा.