दि. २६ नोव्हेंबर २०२३
भारतीय संविधान दिन निमित्ताने भाजपा तर्फे संविधान उद्देशिकेचे वाचन व मण की बात कार्यक्रम.!
- चामोर्शी येथील खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रम संपन्न.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी येथील मा. खासदार श्री अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवसा निमित्ताने संविधान उद्देशीकेचे सामुहिक वाचन करण्यात आले व मा.प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांच्या 107 व्या "मण की बात" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संविधान दिवस निमित्त प्रा.प्रशांतजी वाघरे,भाजपा जिल्हा अध्यक्ष,गडचिरोली. यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला मालार्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले. संविधान उद्देशीकेचे सामुहिक वाचन श्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोली.यानी करवून घेतले.
यावेळी मंचावर श्री प्रशांतजी वाघरे,जिल्हा अध्यक्ष,भाजपा गडचिरोली.श्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोली.श्री आंनदभाऊ भांडेकर,भाजपा ता.अध्यक्ष,चामोर्शी.श्री सोपाणजी नैताम,भाजपा शहर अध्यक्ष,चामोर्शी.श्री रमेशजी बारसागडे, जिल्हा अध्यक्ष,भाजपा किसान मोर्चा,गडचिरोली.श्री स्वप्नीलजी वरघंटे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,श्री भास्करजी बुरे,जिल्हा महामंत्री,ओबीसी मोर्चा,गडचिरोली. उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा.प्रशांतजी वाघरे, श्री प्रकाश गेडाम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री रमेश अधिकारी यानी आभार श्री आंनदभाऊ भांडेकर यानी केले.
यावेळी रोशनीताई वरघंटे,नगरसेविका,चामोर्शी, श्री रेवनाथ कुसराम,श्री चुधरी,श्री रमेश सरकार,श्री दुबे,श्री खेडेकर,उपस्थित होते.