दि. १६ नोव्हेंबर २०२३
कोठरी बुद्ध विहाराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ; आ. डॉ. देवरावजी होळी
- पर्यटन विकासातून २.५ कोटी तर विद्युतीकरणासाठी ७५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याची दिली माहिती
कोठरी येथील बुद्ध विहाराला आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भेट देऊन कार्यक्रमात घेतला सहभाग
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोठरी येथील अरण्यवास बुद्ध विहाराच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून यावर्षी पर्यटन विकासातून २.५ कोटी तर विद्युतीकरणासाठी ७५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणल्याचा आनंद झाला असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी कोठरी येथील बुद्ध विहाराला भेट दिल्याच्या प्रसंगी केली.
यावेळी त्यांनी कोठरीच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत असून येथील विकास कामांसाठी आपण कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिले.